सर्व
देशाचे लक्ष लागलेले व जनतेची एकमुखी मागणी असलेले लोकपाल विधेयक सरकार
पास करू शकले नाही. बेजबाबदार राजकीय संस्कृतीचे दर्शन आज देशाला पहायला
मिळाले. कांग्रेस ने देशाचा विश्वासघात केला आणि विरोधी पक्षाने त्याला साथ
दिली. . सर्वोच्य सभागृहात लोकशाहीची नाचक्की झाली. संसदेच्या इतिहासताला
काळाकुट्ट दिवस आज जनतेने अनुभवला, अण्णांच्या आरोपंना एकप्रकारे पुरवाच
मिळाला. सक्षम लोकपाल कुठल्याही राजकीय पक्षाला नकोय , संसद चोरांचा अड्डा
बनलेला आहे. संसदेच पावित्र्य धोक्यात आलाय. खासदार संसदेपेक्षा स्वताहाला
सर्वश्रेठ समजू लागले आहेत. लोकपालावर मंत्र्यांची मते घेण्यापेक्षा थेट
जनतेची मते घ्या.
No comments:
Post a Comment