आण्णा हजारेंनी सुरु केलेले देशव्यापी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हे 'अहिंसक' आहे हीच सरकार पुढची सगळ्यात मोठी समस्या आहे, असे आंदोलन कसे आटोक्यात आणावे याचा अनुभव/ कसब भारतीय इतिहासात कोणत्याही राजकीय पक्ष्याकडे नाही. त्यामुळे टीम आण्णा कुठे तरी चूक करेल आणि मग आपण त्यांना घेरू हि "wait and watch" "थांबा आणि पहा " ची भूमिका सरकारने आतापर्यंत घेतली होती, आणि टीम आण्णांनी केलेले वक्तव्याने सरकारला संधीच चालून आली, टीम अण्णांचे वक्तव्य जर संसदेतल्या खासदारांना हक्कभंग वाटत असेल तर मग संसदेमध्ये जे गुन्हेगार बसलेले आहेत ते काय संसदेचे "भूषण" आहेत का? त्याबद्दल एकही खासदार आज बोलायला तयार नाही. न्यायालयाने ,कॅग(CAG) ने ताशेरे ओढूनही मंत्र्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत , तरी आज संसद गप्पा का? शरद पवारांवर हाथ उचलला त्यावेळेस सगळे राजकीय नेते एकत्र आले होते, मात्र भ्रष्टाचारा विरुद्ध लढनार्यांचे खून होतात त्यांच्या गुन्हेगारांना आजूनही शिक्ष्या होत नाही,त्यावर संसद गप्पा का? बलात्काराच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत , अजूनही पीडितांना न्याय मिळत नाही यावर नेते मुग गिळून बसलेत. माहितीच्या अधिकारासाठी जनतेला लढा द्यावा लागला, आजही उमेदवार नाकारण्याचा अधिकार(right to reject) मिळवण्यासाठी लोकांना आंदोलन करावे लागतेय, मग संसदेतले खासदार काय करतायत? अजून किती दिवस जनतेला गृहीत धरून चालणार? न्याय मिळवण्यासाठी उद्या जर तरुणांनी बंदुका हातात घेतल्या तर तुम्हाला चालणार आहे का? टीम अण्णांचे मी पूर्णपणे समर्थन करतोय. या लढ्यात आपण सर्वांही सहभागी झाले पाहीजे . जयहिंद !

No comments:

Post a Comment