सर्व देशाचे लक्ष लागलेले व जनतेची एकमुखी मागणी असलेले लोकपाल विधेयक सरकार पास करू शकले नाही. बेजबाबदार राजकीय संस्कृतीचे दर्शन आज देशाला पहायला मिळाले. कांग्रेस ने देशाचा विश्वासघात केला आणि विरोधी पक्षाने त्याला साथ दिली. . सर्वोच्य सभागृहात लोकशाहीची नाचक्की झाली. संसदेच्या इतिहासताला काळाकुट्ट दिवस आज जनतेने अनुभवला, अण्णांच्या आरोपंना एकप्रकारे पुरवाच मिळाला. सक्षम लोकपाल कुठल्याही राजकीय पक्षाला नकोय , संसद चोरांचा अड्डा बनलेला आहे. संसदेच पावित्र्य धोक्यात आलाय. खासदार संसदेपेक्षा स्वताहाला सर्वश्रेठ समजू लागले आहेत. लोकपालावर मंत्र्यांची मते घेण्यापेक्षा थेट जनतेची मते घ्या.
पुण्या सारख्या सुसंकृत शहरात मानकर सारखा गुन्हेगारी च्या केसेस दाखल झालेला माणूस उप महापौर सारख्या पदांवर बसत असेल तर यातून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनतेला नक्की काय संदेश द्यायचा आहे? असेच जर होत राहिले तर येत्या विधानसभा/लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अखेरचा श्वास घेतील. लोकशाहीच्या देशात हि लाजेची गोष्ट आहे आणि पुणेकर देखील हे कसे काय सहन करतात? जनतेने दाखवलेल्या निष्ठेची जर राजकीय पक्ष विष्ठा करत आसतील तर हि चिंतेची बाब आहे. लोकपाल तर कोणत्याही राजकीय पक्ष्याला नकोच आहे. शिवाय राजकारणात गुन्हेगारांना जी काही मानाची/सन्मानाची वागणूक मिळते आहे व गुन्हेगारी वृत्तीचे लोक मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, हे पाहता आता जनतेनेच रस्त्यावर उतरावे लागेल. आशावेळेस right to reject (उमेदवार नाकारण्याचा अधिकार) नक्की उपयोगी पडेल. कारण राजकीय पक्ष्य कोणत्याही उमेदवाराला तिकीट देतात, त्यात जनतेला कुठेही हस्त्यक्षेप करता येत नाही. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पर्यावरण खात्याची परवानगी मिळत नाही, मात्र लावासाच्या बाबतीत पर्यावरणाचे नियम डावलून बांधकाम केले जाते. आण्णा हजारे सारखा चांगला माणूस भ्रष्टाचाराचे आंदोलन केले म्हणून जेल मध्ये जातो, आणि मानकर सारखा गुन्हेगारीच्या केसेस दाखल झालेला माणूस उप महापौर होतो, एखाद्या गरिबाला घर बांधायला दहा ठिकाणच्या परवानगी घ्याव्या लागतात मात्र आदर्श सारख्या इमारती सगळे नियम डावलून उभ्या राहतात आणि या देशाची जनता मुगगिळून बसण्या शिवाय काही करू शकत नाही, असेल जर होत राहिले तर तरुणांना हे सगळे थांबवण्यासाठी हातात तिरंगा घेऊन आता रस्त्यावर उतरावे लागेल. आपल्या जन्मदात्या आईने आपल्याला जेवढे दिले आहे तेवढेच आपल्या मातृभूमीने आपल्याला दिले आहे, याच मातृभूमीच्या लोकशाहीचे पवित्र मंदिराचे रक्षणाची जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल.
आण्णा हजारेंनी सुरु केलेले देशव्यापी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हे 'अहिंसक' आहे हीच सरकार पुढची सगळ्यात मोठी समस्या आहे, असे आंदोलन कसे आटोक्यात आणावे याचा अनुभव/ कसब भारतीय इतिहासात कोणत्याही राजकीय पक्ष्याकडे नाही. त्यामुळे टीम आण्णा कुठे तरी चूक करेल आणि मग आपण त्यांना घेरू हि "wait and watch" "थांबा आणि पहा " ची भूमिका सरकारने आतापर्यंत घेतली होती, आणि टीम आण्णांनी केलेले वक्तव्याने सरकारला संधीच चालून आली, टीम अण्णांचे वक्तव्य जर संसदेतल्या खासदारांना हक्कभंग वाटत असेल तर मग संसदेमध्ये जे गुन्हेगार बसलेले आहेत ते काय संसदेचे "भूषण" आहेत का? त्याबद्दल एकही खासदार आज बोलायला तयार नाही. न्यायालयाने ,कॅग(CAG) ने ताशेरे ओढूनही मंत्र्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत , तरी आज संसद गप्पा का? शरद पवारांवर हाथ उचलला त्यावेळेस सगळे राजकीय नेते एकत्र आले होते, मात्र भ्रष्टाचारा विरुद्ध लढनार्यांचे खून होतात त्यांच्या गुन्हेगारांना आजूनही शिक्ष्या होत नाही,त्यावर संसद गप्पा का? बलात्काराच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत , अजूनही पीडितांना न्याय मिळत नाही यावर नेते मुग गिळून बसलेत. माहितीच्या अधिकारासाठी जनतेला लढा द्यावा लागला, आजही उमेदवार नाकारण्याचा अधिकार(right to reject) मिळवण्यासाठी लोकांना आंदोलन करावे लागतेय, मग संसदेतले खासदार काय करतायत? अजून किती दिवस जनतेला गृहीत धरून चालणार? न्याय मिळवण्यासाठी उद्या जर तरुणांनी बंदुका हातात घेतल्या तर तुम्हाला चालणार आहे का? टीम अण्णांचे मी पूर्णपणे समर्थन करतोय. या लढ्यात आपण सर्वांही सहभागी झाले पाहीजे . जयहिंद !
लोकशाही मार्गांना तुम्ही प्रतिसाद देणार नसाल, तर उद्या तरुणांनी चिडून हातात बंदुका घेतल्या तर तुम्हाला चालणार आहे का? अण्णांनी तरुणांना सत्याग्रहाच्या मार्गाचं महत्त्व पटवून दिलं, नक्षलवादाकडे जाण्यापासून सध्या तरी रोखलं हे त्यांच्या उपोषणाचं यश मानलं पाहिजे. त्यांच्यावर ब्लॅकमेलिगचा आरोप करणाऱ्यांची डोकी ठिकाणावर नाहीत किवा सत्तेने भ्रष्ट झाली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

Anna Hajare

तुमच्या सर्वांच्या सोबतीने / पाठींब्यामुळे आपण जनलोकपालाचे पहिले पाऊल टाकले, सर्वांचे खुप - खुप अभिनंदन ! हा जनतेचा विजय आहे..... यापुढेही हा लढा असाच चालू राहील.... . जनतेची एकजूट जिंकली.... -आपण एकत्र आलो तर नक्की बदल घडवू शकतो .मी मिडिया ला सुद्धा धन्यवाद देतो कारण खर्या अर्थाने आज मिडिया लोकशाहीचे "आधार स्तंभ" म्हणून जनते सोबत उभा राहिला....जय हिंद ....!!!!!